मुंबई: उद्योगपती गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी अदानी गुरूवारी रात्री पावने नऊ वाजता भेटीसाठी पोहोचले आणि या दोघांमध्ये सुमारे एक तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
एकीकडे धारावीचा मुद्दा उद्धव ठाकरे गटाकडून मोठा केला जात असताना दुसरीकडे गौतम आदानी आणि शरद पवार यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.