Dry Days List 2024 : नववर्षाचे कॅलेंडर आल्यानंतर सर्वप्रथम सण, सभारंभ, वाढदिवस यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचे वार किंवा तारखा पाहिल्या जातात. पण त्यासोबतच काही मद्यप्रेमी हे ड्राय डे कधी आहे याचीही माहिती घेत असतात. या दिवशी मद्य विक्रीला पूर्णपणे बंदी असते. २०२३ वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नुकतंच उत्पादन शुल्क विभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ड्राय डेची यादी जाहीर केली आहे.
जगभरात नवीन वर्ष २०२४ चे स्वागत करण्यासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. अनेकदा लोक नवीन वर्षाची सुरुवात पार्टीने करतात आणि काही लोक या पार्टीत दारूचाही समावेश करतात. अशातच उत्पादन शुल्क विभागाने पुढील २०२४ वर्षाची ड्राय डेची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण २४ ‘ड्राय डे’ असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मद्यप्रेमींची अडचण होण्याची शक्यता आहे.
२०२४ ड्राय डे संपूर्ण यादी
जानेवारी महिन्यात ३ दिवस ‘ड्राय डे’
- १५ जानेवारी, सोमवार: मकर संक्रांती
- २६ जानेवारी, शुक्रवार: गणतंत्र दिवस
- ३० जानेवारी, बुधवार: शहीद दिवस
फेब्रुवारी महिन्यात १ दिवस ‘ड्राय डे’
- १९ फेब्रुवारी, सोमवार: छत्रपती शिवाजी महाराज जयंती
मार्च महिन्यात ४ दिवस ‘ड्राय डे’
- ५ मार्च, मंगळवार: स्वामी दयानंद सरस्वती जयंती
- ८ मार्च, शुक्रवार: महाशिवरात्री
- २५ मार्च, सोमवार: होळी
- २९ मार्च, शुक्रवार: गुड फ्राइडे
एप्रिल महिन्यात ४ दिवस ‘ड्राय डे’
- १० एप्रिल, बुधवार: बकरी ईद
- १४ एप्रिल, शनिवार: आंबेडकर जयंती
- १७ अप्रैल, बुधवार: रामनवमी
- २१ अप्रैल, रविवार: महावीर जयंती
मे महिन्यात १ दिवस ‘ड्राय डे’
- १ मे, सोमवार: महाराष्ट्र दिन
जुलै महिन्यात २ दिवस ‘ड्राय डे’
- १७ जुलै, बुधवार: आषाढ़ी एकादशी
- २१ जुलाई, रविवार: गुरु पौर्णिमा
ऑगस्ट महिन्यात २ दिवस ‘ड्राय डे’
- १५ ऑगस्ट, बुधवार: स्वातंत्र्य दिन
- २६ ऑगस्ट, सोमवार: श्रीकृष्ण जन्माष्टमी
सप्टेंबर महिन्यात २ दिवस ‘ड्राय डे’
- ७ सप्टेंबर, शनिवार: गणेश चतुर्थी
- १७ सप्टेंबर, मंगलवार: ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी
ऑक्टोबर महिन्यात ४ दिवस ‘ड्राय डे’
- २ ऑक्टोबर, मंगलवार: गांधी जयंती
- ८ ऑक्टोबर, सोमवार: निषेध सप्ताह
- १२ ऑक्टोबर, शनिवार: दसरा
- १७ ऑक्टोबर, गुरुवार: महर्षी वाल्मिकी जयंती
नोव्हेंबर महिन्यात ३ दिवस ‘ड्राय डे’
- १ नोव्हेंबर, शुक्रवार: दीपावली
- १२ नोव्हेंबर, मंगलवार: कार्तिकी एकादशी
- १५ नोव्हेंबर, शुक्रवार: गुरु नानक जयंती