कोल्हापूर : राज्यात सलग दोन वर्ष झालेल्या राजकीय भूकंपामुळे राजकारणात कोण सत्तेत आणि कोण विरोधात हे कळत नाहीये. जिल्ह्याच्या मुश्रीफ आणि बंटी पाटील यांच्या वाटा स्वतंत्र झाल्याने नवीन गट्टी आता धनंजय महाडिक आणि मुश्रीफ आणि यांच्याचत जवळीकता वाढली आहे. त्याची प्रचिती पहायला मिळाली. जिल्हा पोलिस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा आज (25 डिसेंबर) धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी धनंजय महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसले होते.
दुसरीकडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यानी रविवारी महायुतीमधील पक्षांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हीही लागू शकते, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांतच कामाच्या यादीसह निधीची मागणी महायुतीतील घटक पक्षांनी कळवावी, असे आवाहन त्यांनी केले. नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीपैकी प्रत्येकी 30 टक्के निधी भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाला देण्याचा फॉर्म्युला यापूर्वीच निश्चित झाला आहे.
उर्वरित दहा टक्के निधी नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री यांना द्यावा लागतो. पक्षांना मिळणाऱ्या निधीपैकी काही निधी त्या पक्षासोबत काम करणाऱ्या सहयोगी पक्षांना द्यावेत असा फॉर्म्युला यापूर्वीच निश्चित झाला आहे. या फॉर्म्युलानुसारच प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुश्रीफ यांनी बैठकीत दिल्या.