डोंबिवली (ठाणे) : डोंबिवलीत मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या वडीलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. राजूनगर खाडीत एक अडीच वर्षाची चिमुकली बुडाली. या घटनेत तिचे वडील बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आणि फायर ब्रिगेड यांनी शोध मोहिम सुरू केली आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी या दोघांचाही शोध घेत आहेत.
एक इसम तिच्या अडीच वर्षाच्या मुलीसोबत खाडीजवळ आला होता. मुलगी खेळत असताना खाडी किनारी गेली. अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली. त्यावेळी मुलगी बुडत असल्याचं दिसताच तिच्या वडीलांनी तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. चांद शेख नावाचा तरुणाने दोघांना वाचवण्यासाठी धावला, मात्र दोघेही बुडाले होते. या घटनेची माहिती विष्णूनगर पोलिसांना देण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलीस पथकासोबत खाडी किनारी पोहचले. फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले आहेत. शोध मोहिम सुरू झाली आहे. हो दोघे कोण होते आणि ते कुठून आले याचा तपास पोलीस करत आहेत. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.