Dunki vs Salaar : मुंबई : शाहरुख खानच्या ‘डंकी’चित्रपटाला प्रभासच्या ‘सालार’चा फटका बसत आहे. कारण, शाहरुखचे यंदा प्रदर्शित झालेले ‘पठाण’व ‘जवान’या चित्रपटांच्या तुलनेत ‘डंकी’ची पहिल्या दिवसाची कमाई कमी आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. ती पहिल्या दिवसापेक्षा खूप कमी आहे. गुरुवारी २१ डिसेंबर रोजी शाहरुखचा सिनेमा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसरीकडे सालारने ९५ कोटी रुपयांची कमाई केली.
‘डंकी’ हा शाहरुखचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे. शाहरुकच्या ‘पठाण’आणि ‘जवान’च्या पहिल्या दिवसाच्या आकडेवारीपेक्षा खूपच कमी आहे. ‘पठाण’ने ५७ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘जवान’ने पहिल्या दिवशी ७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. शाहरुख खान स्टारर चित्रपटाने शुक्रवारी २०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाचे देशातील एकूण कलेक्शन ४९.७ कोटी रुपये झाले आहे.
‘सालार’च्या रिलीजचा परिणामही ‘डंकी’वर बसत आहे. ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईत घट होत आहे, असे जानकारांचे म्हणणे आहे. प्रशांत नील दिग्दर्शित व प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने शुक्रवारी भारतात ९५ कोटी रुपयांची कमाई करत आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १७५ कोटी रुपये कमावले आहेत.
दरम्यान, वीकेंडला ‘सालार’ व ‘डंकी’ या चित्रपटांच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष आहे. ‘सालार’ची क्रेझ पाहता त्याचा ‘डंकी’ ला फटका बसणार की प्रभासची जादू फक्त दक्षिणेत आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये आहे हे पहायला मिळणार. ‘डंकी’ मध्ये शाहरुख खानबरोबरच तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहे. तर, ‘सालार’ मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन, सरण शक्ती, इश्वरी राव, जगपती बाबू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.