Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नगर: विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून कोतवाली पोलिसांचा सन्मान, चोरीतील ३३ लाखांच्या दागिन्यांसह आरोपी केला जेरबंद

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 23 December 2023, 15:28
Nagar Kotwali police station police felicitated by DIG ahmednagar

नगर: सीसीटीव्ही फुटेज अन् तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लावलेल्या तपासामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह तपास यंत्रणेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष कामगिरी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे या वर्षातील मुद्देमाल हस्तगत होणारी सर्वात मोठी घटना आहे.

ऋषभ सुभाष फिरोदिया (रा.आनंदऋषी हॉस्पिटल, नगर) यांच्या राहत्या घरातील कपाटातील ३३ लाख रुपये किमतीचे ५५ तोळे सोने, घड्याळ व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. मोठ्या रकमेच्या या गुन्ह्याचा तपास लावणे कोतवाली सोबतच अहमदनगर पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. चोरी करताना चोरट्यांनी घेतलेल्या अधिकच्या काळजीमुळे तपासात अडथळे येत होते. या अडथळ्यांवर मात करत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे सखोल तपास करून पोलीस निरीक्षक यादव व त्यांच्या टीमने या गुन्ह्यातील एक आरोपी पकडत ३३ लाख रुपये किमतीचे ५५ तोळे सोन्याच्या मुद्देमालासह हा अवघड गुन्हा उघडकीस आणला आहे.

या वर्षातील हा सर्वाधिक किमतीचा तपास आहे. कोतवाली पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस दलाकडून कौतुक केले जात आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सुद्धा हा गुन्हा कसा उघड उघडकीस आणला याबाबत उपस्थित सर्व अधिकारी यांना सविस्तर माहिती सांगून कौतुक केले. देण्यात आलेल्या या प्रशंसापत्रात ‘सन २०२३ वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावून अहमदनगर पोलीस दलाकरता भरीव योगदान दिलेले आहे. आपली कामगिरी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या दृष्टीने अभिमानास्पद असून आपण यापुढे देखील अशीच दैदीप्यमान कामगिरी करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावत ठेवाल. आपल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपणास प्रोत्साहनपर प्रशंसापत्र प्रदान करण्यात येत आहे’ असे म्हटले आहे.

 

यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अश्विनी मोरे, पोलीस जवान तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, संदीप पितळे, ए. पी. इनामदार, सलीम शेख, अभय कदम, शाहीद शेख, अमोल गाडे, संदीप थोरात, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, दक्षिण मोबाइल सेलचे राहुल गुंडू आदींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
Supreme Court strikes down Electoral Bonds scheme

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली; मराठा समाजाला मोठा दिलासा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.