राहुलकुमार अवचट
यवत : कासुर्डी गावात अयोध्या येथील मंगल अक्षदा कलश मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये संपूर्ण गावासह वाडीवस्तीतील नागरिक सहभागी झाले होते. गावातील गायकवाड वस्ती ते भैरवनाथ मंदिर अशी कलश मिरवणूक टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या गजरात काढण्यात आली. यामध्ये महिला, पुरुष जेष्ठ मंडळी यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
यावेळी कासुर्डी, कामठवाडी, जावजीबुवाचीवाडी, ताम्हाणपट, यवत, डाळिंब आदि परिसरातील भजनी मंडळी यांसह पश्चिम महाराष्ट्र वारकरी मंडळ, अध्यक्ष कीर्तनकार दत्तात्रय महाराज सोळसकर उपस्थित होते.
दरम्यान, कलश मिरवणूक गावात आल्यावर १११ दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत ब्राह्मणांच्या साक्षीने रामरक्षा स्तोत्र, पुण्याहवाचन आणि कलश पूजन करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आयोजकांच्या वतीने पूजेला बसणाऱ्या प्रत्येक जोडीला कलश, उपरणे आणि भगवी टोपी भेट देण्यात आली.
कलश पूजन संपन्न झाल्यानंतर रात्री जेष्ठ सुप्रसिद्ध कीर्तनकार पांडुरंग महाराज गिरी (सिन्नर नाशिक) यांचे हरिकीर्तन झाले. यानंतर सर्व भाविक-भक्तांना बोरा ऍग्रो फूड्स कंपनी यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला. दिवसभर जय श्रीराम, जय हनुमानचा नारा गावात गाजत होता, तर संपूर्ण कासुर्डी आणि परिसरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमचे आयोजन तंटामुक्ती अध्यक्ष माजी सरपंच पांडुरंग आखाडे, सोपान गायकवाड, बाळासाहेब टेकवडे, लक्ष्मण खेनट, संतोष रघुनाथ आखाडे, मयुर सोळसकर, गणेश आखाडे, वासुदेव आखाडे, उत्तम आखाडे, तानाजी गायकवाड, दिलीप गायकवाड,संतोष पोपट आखाडे, बापूसो जगताप, नानासो जगताप, महेंद्र आखाडे, वाल्मिक आखाडे, शशिकांत आखाडे, पै. तात्यासाहेब भोंडवे, बाळासाहेब राजाराम आखाडे, अशोक सोनवणे, दत्तात्रय ठोंबरे, राजाभाऊ आखाडे, विशाल टेकवडे, बाबासो चौंडकर, धनंजय कोडीतकर,अविनाश आखाडे यांनी केले.