Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : अपघातांचा धोका कायम ! ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर नाहीच; साखर कारखान्यांचा डोळे झाकपणा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 December 2023, 14:56

गणेश सुळ

केडगाव : दौंड तालुक्यात ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रक, टॅक्टर-ट्रॉली, छकडी, बैलगाडी आदी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रस्त्यावरून ऊस भरून जाणारी वाहने रात्रीच्या वेळी रिप्लेक्टर अभावी दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. परिणामी वाढत्या अपघातामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्वच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिप्लेक्टर बसविण्याची मागणी होत आहे. यासाठी साखर कारखान्यांनी पुढाकार घ्याण्याची गरज आहे.

दरम्यान, तालुक्यातील सगळ्या साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू आहे. साखर कारखाना किंवा गु-हाळ घरे यांना ट्रक, टॅक्टर-ट्रॉली, छकडी, बैलगाडी आदी वाहनांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक सुरु आहे. अनेक वाहनांना रिप्लेक्टर किंवा रेडियम लावले नसल्यामुळे ऊस भरून जाणारी वाहने रात्रीच्यावेळी दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

 

रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणारी वाहने नादुरुस्त किंवा काही कारणांनी रस्त्यावर थांबून राहतात. पाठीमागून येणार्‍या वाहनांना रात्री ही वाहने दिसत नसल्यामुळे अनेकवेळा अपघात घडले आहेत. तसेच बैलगाड्यांना स्वयंप्रकाशित होईल, अशी कोणतीही व्यवस्था नसते. बैलगाड्यांचा वेगही मर्यादित असतो. त्यामुळे मागून येणाऱ्या सुसाट वाहनांचा वेग अचानक कमी करताना चालकांना कसरत करावी लागते. यामुळे देखील अपघात घडतात. यामुळे बैलगाडीसह सर्व ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिप्लेक्टर, रेडियम लावण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.

त्याचबरोबर ऊस वाहतूक करणारे विशेषतः टॅक्टर चालक मोठ्या आवाजात गाणी लावून वाहने चालवतात. उसाची ओव्हर लोड वाहतूक करतात. त्यामुळे वाहने पलटी होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे त्यावर ही कारवाई होणे गरजेचे आहे. संबंधित साखर कारखाने आणि आरटीओ विभागाने त्वरीत लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी देखील होत आहे.

अनेक ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिप्लेक्टर नसल्यामुळे अपघात घडत आहेत. वाहन चालकांना रात्री ऊस वाहतूक करणरे वाहने जवळ आल्याशिवाय दिसत नाहीत. त्यामुळे सर्व ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिप्लेक्टर बसविणे गरजेचे आहे. संबंधित साखर कारखान्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

– संजय थोरात (अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00
Next Post

Yavat News : मंगल अक्षदा कलशची भव्यदिव्य मिरवणूक; १११ दाम्पत्यांच्या हस्ते पूजा, संपूर्ण कासुर्डी गाव भगवेमय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.