मुंबई : आताकुठे आपण कोरोनामुक्त झालो आहोत, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हॅरिएंटने डोकेवर काढले आहे. ज्या देशातून कोरोनाची सुरूवात झाली, त्याच चीनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 आढळून आला. आज आपण कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी कसे लढू शकतो आणि प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो हे जाणून घेणार आहोत.
कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आपण रोगप्रतिकारक शक्तीवर जास्त लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यासाठी, कॅलरीज, व्हिटॅमिन्स आणि डिटॉक्सीफिकेशनवर लक्ष देऊन कोरोनाचा संसर्ग कमी केला जाऊ शकतो. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता.
निरोगी आरोग्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन्सचा समावेश करणे गरजेचे आहे. खास करून व्हिटॅमिन डी, व्हिटॅमनिन बी6 आणि झिंक इत्यादी घटकांनी युक्त असलेले खाद्यपदार्थ आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
व्हिटॅमिन डीमुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम, फॉस्फरस आणि रक्तपातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे, श्वसनाच्या समस्यांपासून आपल्याला आराम मिळण्यास मदत होते.
चीननंतर अमेरिका, युके, फ्रान्स, आईसलॅंड आणि आता भारतातही या व्हेरिएंटची प्रकरणे आढळून आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातील केरळ राज्यात व्हेरिएंटची अनेक प्रकरणे आढळून आली असून केरळमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातील आरोग्य यंत्रणादेखील सक्रिय झाली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंट JN.1 ला दूर ठेवण्यासाठी आपण आहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कॅलरीज उपयुक्त ठरतात. यासाठी विविध प्रकारच्या व्हिटॅमिन्स आणि खनिजांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. यामुळे, शरीराला उपयुक्त कॅलरीज मिळतील आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होईल. उपयुक्त कॅलरीजसाठी तुम्ही आहारात साखर, गूळ, फळे, फळांचे ज्यूस, तूप आणि कर्बोदकांचा आहारात समावेश करू शकता.