Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यातील ७२ गावांना दरडींचा धोका; राज्य सरकारकडे पीडब्ल्यूडीचा प्रस्ताव

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 22 December 2023, 7:38

पुणे : आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे दरड कोसळण्याची दुर्घटना सन २०१४ मध्ये घडली होती. त्यानंतर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जीएसडीए) आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या सरकारी यंत्रणांनी जिल्ह्यातील धोकादायक गावांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये जिल्ह्यात ७२ गावांना दरडींचा धोका असल्याचे समोर आले आहे.

त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ४४ गावांमध्ये संरक्षणात्मक कामे, उपाययोजनांतर्गत ६८ कोटी १७ लाख रुपयांचा अहवाल तयार केला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे.

केंद्र आण राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या विविध आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी १५ व्या वित्त आयोगाद्वारे निधी मंजूर केला आहे. त्यादृष्टीने विविध आपत्तीमुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी उपाययोजनांतर्गत व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माळीण दुर्घटनेनंतर (२०१४) २३ गावे दरडप्रवण असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जीएसडीए आणि जीएसआय यांनी नव्याने सर्वेक्षण केले असता जिल्ह्यातील ७२ गावांना दरडींचा धोका असल्याचे सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले.

 

आंबेगाव तालुक्यातच सर्वाधिक गावे दरडप्रवण

जिल्ह्यातील माळीण दुर्घटना घडलेल्या आंबेगाव तालुक्यातच सर्वाधिक २३ गावे दरडप्रवण असल्याचे जीएसआयच्या सर्व्हेक्षणात समोर आले असून, मावळात १५, वेल्ह्यात दहा, मुळशी आठ, खेड सहा, जुन्नर आणि भोर तालुक्यात प्रत्येकी पाच असे एकूण सात तालुक्यांत ७२ गावे दरड प्रवण असल्याचे जीएसआयच्या सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

त्यापैकी पीडब्ल्यूडीने ४४ गावांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कामे सुचवली आहेत. पीडब्ल्यूडीमार्फत ४४ गावांमध्ये दरड प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षात्मक, संरक्षणात्मक कामांबात प्रत्यक्षात पाहणी करून संरक्षक भिंत बांधणे, पाण्याचा प्रवाह काढणे, झाडे लावणे किंवा तात्पुरत्या स्थलांतरासाठी पर्यायी व्यवस्था उभी करणे अशी अनेक कामे करणे गरजेची आहेत.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय धोकादायक गावे

  • आंबेगाव – काळेवाडी एक, काळेवाडी दोन, जांभळेवाडी, पांचाळे खु., भगतवाडी खु., तळपेवाडी, सारवली, आवळेवाडी, आसाणे, कुसरे खु., अडिवरे, काळवाडी, आंबरे, कुसरे बु., पासरवाडी, बोरघर, मेघोली, दिगड, बेंडारवाडी, साकेरी, कोलतावडे, दरेवाडी.
  • मावळ – मालेवाडी, सांगिसे, लोहगड, वाडेश्वर, वाउंड, ताजे, शिलाटणे, कलकराय, फलाने, वेहेरवाडी, बोरज, भुशी, कुसावली, मोरमारेवाडी.
  • वेल्हे – टेकपोळे, आंबवणे, सिंगापूर, गर्जेवाडी, घोळ, गिवशी, मानगाव, धनगरवाडी, वाडघर, हरपुड.
  • मुळशी – घुटके, गडले, विठ्ठलवाडी, हिवाळेवस्ती, वाजरकरवाडी, साई, झाडाचीवाडी, कलमशेत. खेड नायफड, शेंद्रेवाडी, गडद, सोनारवाडी, शिरगाव, गडदवाडी.
  • भोर – धानवली, डेहणे, सोनारवाडी, नानावळे, जांभळेवाडी. जुन्नरः भिवडे खु., भिवडे बु., सोनावळे, हातविज, गंगाळघरे.
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Rajvardhan Patil : राजवर्धन पाटील यांनी घेतले हजरत चाँद शाहवली बाबांच्या दर्ग्याचे दर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.