Mumbai Crime : मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वर केसाच्या विग मधून तब्बल 9 कोटीचं कोकेन हस्तगत करण्यात आलं आहे. डोक्यावरील वीगमध्ये आणि अंतर्वस्त्रातून लपवून कोकेन तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. DRI ने केलेल्या कारवाईत समोर आलेल्या माहितीनुसार, ही महिला युगांडाची राहणारी आहे. तिने विग मध्ये ड्रग्स लपवले होते. हे ड्रग्स शोधण्यासाठी यंत्रणांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
दरम्यान, महिलेने शिताफीने डोक्यावरील विगमध्ये त्याचबरोबर अंतर्वस्त्रामध्ये कोकेन लपवण्यात आले होते. अमली पदार्थ लपवण्याच्या या पद्धतीने डिआरआयचे अधिकारी देखील चकित झाले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाने ही (DRI) कारवाई केली आहे. युगांडा देशातील या महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या डोक्यावर लावलेल्या वीगमधून तसेच अंतर्वस्त्रातून 890 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.