Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने विरोधकांच्या इंडिया आघाडीनेही आपल्या बैठकांना जोर दिला आहे. जागावाटप, इंडिया आघाडीचा चेहरा, समन्वयक आदी मुद्दे प्रलंबित असल्याने आज दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक पार पडत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, नितीशकुमार, स्टॅलिन यांच्यासह दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. या बैठकीआधी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना ‘इंडिया आघाडी’चा चेहरा ठरवण्याबाबत सर्वात मोठे विधान केले आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील अनेक प्रादेशिक पक्ष सामील होते. त्यामुळे या कालावधीनंतर आज इंडिया आघाडीची बैठक होत आहे. अनेक मुद्यांवर आज चर्चा होईल. तीन राज्यातील निवडणुकांच्या निकालावर चर्चा होणं आवश्यक आहे. आता निवडणुकीच वर्ष सुरू होत आहे.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती या बैठकीतून ठरवली जाईल. पंतप्रधानपदाचा चेहरा नाही, पण आघाडीला कोणीतरी निमंत्रक असावा, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी चेहरा हवा. त्यामुळे आघाडीचा चेहरा ठरवता येतो का? हे पाहावे लागेल. असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीची स्थापना झाल्यापासून या आघाडीचा चेहरा समोर आलेला नाही. बैठकीच्या निमित्ताने त्या त्या राज्यातील नेत्यावर बैठकीची जबाबदारी देण्यात आली. परंतु, या आघाडीचा समन्वय किंवा चेहरा समोर आलेला नाही. तसंच, इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवारही जाहीर करण्यात आलेला नाही. यावरून एनडीएने अनेकदा टीकाही केली.
एनडीएकडून पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींचा चेहरा समोर आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतून ही संधी कोणाला दिली जाईल, यावर चर्चा होणे बाकी आहे. याबाबत ठाकरे म्हणाले, “मोदींच्या समोर चेहरा हा विषय असला तरीही या आघाडीला समन्वयक, निमंत्रक आणि शक्य असेल तर एखादा चेहरा ठरवता येतो का याचा विचार कारावा लागेल. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
VIDEO | “In today’s meeting, we will discuss various things. We need a coordinator (of the alliance), it is not necessary that the coordinator will go on to lead the alliance, but it is important to have one,” says Shiv Sena (UBT) leader @ShivSenaUBT_ ahead of INDIA bloc meeting… pic.twitter.com/LJcmy9yR7A
— Press Trust of India (@PTI_News) December 19, 2023