Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; केंद्र सरकार २ लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 19 December 2023, 11:34

पुणे : कांदा पीक सातत्याने चर्चेत असते. कधी कांदा शेतकऱ्यांना हसवतो, तर कधी रडवतो. आता केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला आहे. परिणामी कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. नाशिक, पुणे, सोलापूर बाजार समित्यांमध्ये १५ दिवसांपूर्वी कांद्याचे दर चार हजारांवर पोहचले होते. आता हे दर निम्म्यावर आले आहेत. दरम्यान, कांद्याचे दर पडल्याने शेतकरी संतप्त झाले असून, अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय एनसीसीएफ आणि नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने घेतल्याची माहिती ‘एनसीसीएफ’च्या व्यवस्थापकीय संचालिका अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली.

नाफेड, एनसीसीएफ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार
केंद्र सरकार नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी करणार आहे. नाफेड आणि एनसीसीएफ यांनी आतापर्यंत पाच लाख मॅट्रिक कांदा खरेदी केला आहे. अजून दोन लाख टन कांदा खरेदी करुन घसरत असलेले दर रोखण्याचा उपाय सरकार करणार आहे. या दोन्ही संस्थांनी २५ रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी सुरू केली आहे. या निर्णयामुळे कांद्याच्या दरात होणारी घसरण रोखण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, नागपूर येथे सुरु असलेल्या अधिवेशनादरम्यान कांद्यासाठी राज्यात प्रथम कांदा महाबँक स्थापन केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. भाभा अणू संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ अजित कुमार मोहंती आणि अनिल काकडकर यासाठी सरकारला मदत करणार आहेत. कांदा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जाणार आहे. यामुळे कांदा टिकणार असून, सात ते आठ महिन्यांत कांद्याला कोंबही फुटणार नाही. हा प्रयोग केलेला कांदा विधीमंडळात दाखवण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकरी प्रश्नी निवेदन देताना सांगितले.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post
Eknath shinde govt indicates action against Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : इंडिया आघाडीचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंच सूचक विधान; म्हणाले, आजच्या बैठकीत...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.