नागपूर : कार पंक्चर करून मागची काच फोडून लॅपटॉपसह रोख रक्कम लांबविल्याची घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली. ही घटना वाई शॉप बियर बार जवळ कन्हान कांद्री येथे घडली.
तनूश चंद्रशेखर कांबळे (वय 27, रा. प्लॉट 546, खदान लेआऊट, बजनबाग) हा कंपनीचे रिजनल मॅनेजर राहुल सिंग मनसिंग हजेरी यांच्या (एमएच 26 बीएक्स 7167) कारने दोघेही रामटेक येथे जाण्यास निघाले होते. रामटेक येथून एका सिमेंटच्या बिलाचे एक लाख रुपये डिस्ट्रीब्युटरला देण्यास दिले होते ते पैसे तनूश याने आपल्या कॉलेज बॅगमध्ये कारच्या मागच्या सीटवर लॅपटॉप बॅगच्या बाजूला ठेवले होते. ते दोघेही कारने नागपूरला जाण्यास निघाले.
तनूशने आपल्या कारच्या मागच्या सीटवर लॅपटॉप बॅगच्या बाजूला ठेवले होते. दोघेही कारने नागपूरला जाण्यास निघाले व तनूश हे नाष्टा करायला रस्त्याकडेला गाडी उभी केली. पण नाष्टा करून कारजवळ आले, तेव्हा कारचे समोरील चाक पंक्चर झालेले दिसले. तर मागील काच फोडलेली दिसली. यामध्ये मागच्या सीटवर ठेवलेले लॅपटॉप व रक्कम 1 लाख रुपये ठेवलेली बॅग असा एकूण 1,22,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात कन्हान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.