नवी दिल्ली: संसदेच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्या सहा जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. स्मोक केनसह लोकसभेत उडी घेण्यापूर्वी ते इतर अनेक योजनांवर विचार करत होते, असा खुलासा या आरोपींनी केला आहे. त्यांनी संसदेतच आत्मदहन आणि पत्रके वाटण्याची योजना आखली होती.
दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. अशा स्थितीत भाजप खासदार प्रताप सिम्हा यांचेही जबाब नोंदवण्याचा विशेष सेल विचार करत आहे. प्रताप सिम्हा हे खासदार आहेत, ज्यांनी यापैकी दोन आरोपींना व्हिजिटर पास दिले होते. सागर शर्मा आणि मनोरंजन या दोघांनी संसदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान व्हिजिटर गॅलरीतून लोकसभेत उडी मारली. त्यांच्याकडे स्मोक केन होते. ज्यातून पिवळा धूर निघत होता. या लोकांनी संसदेत घोषणाबाजी केली, त्याचवेळी उपस्थित खासदारांनी त्यांना पकडले.
13 डिसेंबरला काय घडलं?
हे दोघेजण संसदेत घोषणाबाजी करत होते आणि निषेध करत होते, त्याचवेळी अमोल शिंदे आणि नीलम देवी या आणखी दोघांनी संसद परिसराबाहेर ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या. आरडाओरड करताना त्याने स्मोक केनमधून रंगीत धूर सोडला. याशिवाय पाचवा आरोपी ललित झा याने कॅम्पसबाहेर झालेल्या निषेधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले.
हल्लेखोरांचे इतरही प्लॅन
तपासाशी निगडित असलेल्या दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘या योजनेला अंतिम रूप देण्याआधी (लोकसभेच्या चेंबरमध्ये उडी मारण्यासाठी) त्यांनी काही मार्ग शोधून काढले होते, जे त्यांचा संदेश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी ठरू शकले असते. ‘त्यांनी प्रथम शरीराला अग्निरोधक जेलने झाकून आत्महत्या करण्याचा विचार केला. परंतु, ही योजना सफल झाली नाही. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी संसदेत पत्रके वाटण्याचाही विचार केला होता, परंतु अखेरीस त्यांनी बुधवारी अंमलात आणलेल्या त्यांच्या योजनेनुसार पुढे गेले.
स्पेशल सेलच्या काउंटर इंटेलिजन्स टीमने या प्रकरणाच्या संदर्भात म्हैसूरचे भाजप खासदार यांचा जबाब नोंदवण्याची योजना आखली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी नेले, जिथे सर्वांनी भेटून हा कट रचला.
दिल्ली पोलिसांनी केली सहावी अटक
संसदेवर झालेल्या धुमश्चक्री प्रकरणी दिल्ली पोलीस वेगाने अटक करत आहेत. याच प्रकरणात सहाव्या आरोपीलाही शनिवारी अटक करण्यात आली आहे. महेश कुमावत असे त्याचे नाव आहे. दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून महेशही या संपूर्ण कटाचा एक भाग असल्याचे सांगितले. त्याला तासाभराच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील रहिवासी असलेला महेशही १३ डिसेंबरला दिल्लीत आला होता. त्याच दिवशी दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या दालनात उडी मारली. तिथे त्यांनी धूर पसरवला आणि पुढच्याच क्षणी या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली.