लोणी काळभोर, (पुणे) : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. १३) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
उत्तम बाबुराव जवळकर (वय ५६, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम जवळकर हे शेतकरी होते. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जवळकर हे घरातील खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळताच त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, उत्तम जवळकर यांनी आत्महत्या का केली, यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.