दिनेश सोनवणे
दौंड : रावणगाव (ता. दौंड) बदलते हवामान, पीक पद्धती, पाणी या संदर्भातील प्रश्नावरील रावणगाव ( ता दौंड) येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आहे.
रावणगाव हे खडकवासला धरणाच्या लाभक्षेत्रातील गाव असून, गावामध्ये केलेल्या अभ्यासात लाभक्षेत्रातील भूजल आणि कालव्याच्या संयुक्त वापराचा अभ्यास करणे हा उद्देश होता. येथील राष्ट्रसंत तुकडोजी एज्युकेशन सोसायटी ही संस्थेने देखील सहभाग घेतला होता. संस्थेचे प्रमुख रविंद पोमणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी गावाची पाणी समस्या , हवेचे प्रदूषण, मातीचे प्रदूषण यावर जलतज्ञ डॉ. प्रदीप पुरंदरे, डॉ. भारत पाटणकर, डॉ. के. जे. जॉय एक्वा डॅम चे हिमांशू कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान, रावणगाव (ता. दौंड) आणि रंदुल्लाबाद (जिल्हा सातारा) ह्या दोन गावांमध्ये करण्यात आलेला हा अभ्यास एकूण सात देशांमध्ये झालेल्या ‘Transformations to Groundwater Sustainability’ ह्या अभ्यास प्रकल्पाचा भाग होता. सोपेकॉम आणि अॅक्वाडॅम ह्या दोन संस्था २०१९ पासून भूजलाची बदलती परिस्थिती, शेती, आणि सामाजिक संबंध ह्यांचे परस्परांवर होणारे परिणाम यांचा अभ्यास करत आहेत.
या चर्चा सत्रास शेतकरी तसेच आजी-माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे आजी-माजी चेअरमन तसेच संचालक भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक इत्यादी उपस्थित होते. हा प्रकल्प यशस्वी करण्यास येथील सचिन विलास भोपाळ यांचे मोठे योगदान आहे. प्रेसिडेंट हॉटेल डेक्कन पुणे येथे चर्चा सत्र आयोजित केले होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कुलकर्णी यांनी केले.