उरुळी कांचन, (पुणे) : पोटगी व मुलीचा ताबा मिळण्यासाठी पोलीस ठाण्यात केलेली केस मागे घेण्याच्या कारणावरून जावयाने सासूला चाकूने भोकसल्याची घटना घडली आहे. ही घटना नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श कॉलनी येथे बुधवारी (ता. १३) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
संग्राम बळवंत शिंदे (वय ३८, रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोंडनिंव ता. माढा जि. सोलापुर) असे हल्ला करणाऱ्या आरोपी जावयाचे नाव आहे. तर अलका गवळी (रा. नायगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. या प्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (वय २८, रा. सध्या आर्दश कॉलनी नायगाव, ता. हवेली, जि. पुणे. मुळ रा. शिंदे वस्ती रेल्वेलाईन जवळ मोडनिंब ता. माढा जि.सोलापुर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संग्राम व रुपाली यांचा विवाह झालेला आहे. त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. बुधवारी संग्राम हा रुपाली राहत असलेल्या ठिकाणी आला होता. रुपाली शिंदे यांनी संग्राम याच्यावर पोटगी व मुलीचा ताबा मिळणेबाबत फिर्याद दिली होती.
त्यानंतर संग्राम याने रुपालीला केलेली केस मागे घे, असे म्हणाला. यावेळी फिर्यादी आरोपीस जे काही होईल ते कोर्टात होईल” असे म्हणाले, याचा संग्रामला राग आला. त्याने टिफिनच्या पिशवीतुन आणलेला धार धार चाकू काढत रुपाली यांना तुला जिवानशी सोडणार नाही, असे म्हणाला.
यावेळी संग्राम हा रुपालीच्या अंगावर धावून जात असताना अल्का गवळी यांनी मध्यस्थी केली. आरोपी संग्राम याने तुझ्यामुळेच सगळे होत आहे. तूच केस मिटवू देत नाही. तुलाच खल्लास करतो असे म्हणत, जवळील धाराधार चाकूने सासू अल्का गवळी यांना ३ वेळेस भोकसले. तसेच डाव्या हातावर वार करुन गंभीर जखमी केले असल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संग्राम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.