ठाणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. माहितीच्या बदल्यात आरोपीने ऑनलाईन पैसे स्विकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेरांच्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅप वर तो संपर्कात होता. महाराष्ट्र एटीएसने चौकशी केल्यानंतर चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला हनी ट्रॅप अडकवल्याचा संशय असून याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.
Maharashtra ATS has arrested an accused on charges of collating confidential information about the Indian Government with a Pakistani agency. A youth named Gaurav Patil (23), who worked in the Naval Dock (Civil apprentice) has been arrested in the matter.
The accused was in…
— ANI (@ANI) December 13, 2023
महाराष्ट्र एटीएसने ठाण्यातून अटक केलेल्या तरुणाचे नाव गौरव पाटील असे आहे. 23 वर्षीय गौरव पाटील नोवल डॉक येथे कामाला होता. गौरव हा फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मागील चार ते पाच महिन्यांपासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात होता. त्याने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचेही एटीएसने सांगितले आहे. गौरव पाटीलशिवाय अन्य तीनजण पाकिस्तानचा गुप्तहेर संपर्कात होते. एटीएसने या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.