दिनेश सोनवणे
दौंड : खडकी (ता.दौंड) येथिल ब्राईट फ्यूचर इंग्लिश मीडियम स्कूल आणि जु. कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी तेजस रविन्द्र ससाणे याने जी मेन परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे. तर विद्यालयाची विद्यार्थिनी निकिता सुरेश थोरात हिने एम एच -सीईटी मधे ८५ टक्के गुण मिळवले आहेत.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी विविध नामवंत क्लासेस लावत आहेत. लाखों रूपये खर्च करतात. मात्र विद्यालयाचा विद्यार्थी तेजस ससाणे आणि विद्यार्थिनी निकिता थोरात हिने बाहेर कोणत्याही प्रकारचे क्लासेस नव्हते. आणि दोघांनीही घरीच अभ्यास करून यश मिळविले आहे. दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष राजु गायकवाड, खजिनदार तुषार काळे यांच्या हस्ते करण्यात सत्कार आला. यावेळी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी शाळेतील इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शाळा, संस्था आणि शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी बोलताना अध्यक्ष गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रामाणिक पणे, अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते, त्यांच्या या यशात आई, वडील, नातेवाईक, मित्र परिवार यांचा वाटा असतो तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांनच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका हे शिक्षक वजाबत असतात.
दरम्यान, यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेच्या वतीने कौतुक केले. तर विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका राधिका यांनी केले.