Gold Silver Price : मुंबई : तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीसाठी घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर जाणून घ्या.
सोन्याच्या दरात किंचित घट
आज शनिवारी 9 डिसेंबर सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 57,150 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 46,760 रुपये प्रतितोळा आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 62,350 रुपये प्रतितोळा आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 550 रुपयांनी कमी झाला आहे.
चांदीच्या दरातही घसरण
आज सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. शनिवारी एक किलो चांदी अवघ्या 1200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 76,000 रुपये आहे.
देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर
मुंबईत सोन्याचा दर 550 रुपयांनी स्वस्त, 62350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. दिल्लीतही सोनं 600 रुपयांनी घसरला असून आज सोन्याचा भाव 62500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. कोलकातामध्ये सोन्याचा भाव 600 रुपयांनी कमी झाला आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये सोनं 770 रुपयांनी स्वस्त झालं असून आज सोन्याचा दर, 62890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर
पुण्यात 600 रुपयांनी सोने स्वस्त 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर नाशिकमध्ये 600 रुपयांनी स्वस्त 62380 रुपये प्रति 10 ग्रॅम, नागपूरमध्ये 600 रुपयांनी महागलं 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम, कोल्हापूरमध्ये 600 रुपयांनी महागलं 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम.