पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एका फटाक्याच्या गोदामाला मोठी आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. सदर फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे.
या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवलं आहे. तर दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत.आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे. वाढदिवसाला लावण्यात येणाऱ्या स्पार्कल्सचा हा कारखाना होता. या लागलेल्या आगीत कारखान्यातील सर्व वस्तू जळून खास झाल्या आहेत.
या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही मोठी दुर्घटना घडली आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असंही शेखर सिंह यांनी सांगितले.