नवी दिल्ली : राज्यात मराठा आरक्षणाचा अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झाल्याने राज्य सरकार तसेच इतर सादर झालेल्या याचिकांवर आज 6 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीचा तपशील सादर झाला नसला, तरी आज संध्याकाळपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णययेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास तयारी दाखवल्यास काही प्रमाणात कोंडी फुटू शकते. मात्र, याचिका फेटाळल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे. (Maratha Reservation)