Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बिबटप्रवण तालुक्यांत दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याचे निर्देश द्या : डॉ. अमोल कोल्हे

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 December 2023, 15:21
Amol kolhe files complaint against NCP worker in shirur loksabha pune

पुणे : जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करण्यासाठी तसेच या चारही तालुक्यांत दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीसंदर्भात तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव आणि वनविभागाचे महासंचालक चंद्रप्रकाश गोयल यांनी दिले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. मानवी वस्त्यांत बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांसह शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

त्यामुळे बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावणे पुरेसे नाही, तर बिबट प्रजनन नियंत्रण करण्याची गरज आहे, अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे सातत्याने मांडत आहेत. याच मागणीच्या अनुषंगाने आज त्यांनी केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्री यादव यांच्या सूचनेवरून वन विभागाचे महासंचालक गोयल यांचीही भेट घेतली.

 

या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी बिबट प्रजनन नियंत्रण करावे, या मागणीबरोबरच बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याची आणि बिबट-मानव संघर्षाबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांनी तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

घोणस सर्पदंश झालेल्यांना मदतीची मागणी
बिबट्यांच्या हल्ल्याइतकाच घोणसच्या सर्पदंशाचा विषयही गंभीर झाला असून, सर्पदंश झालेल्या व्यक्तींना वेळेत उपचार न मिळाल्यास दगावण्याचा धोका असतो. सर्पदंशावरील उपचारासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे अशा रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार व्हावेत. तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा बळी पडलेल्या व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते.

त्याच धर्तीवर सर्पदंशाने मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांच्याकडे केली. या मागणीची तातडीने दखल घेत केंद्रीयमंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांनी स्नेक बाईट सेंटर सुरू करता येईल का? किंवा घोणस सर्पदंशाचे प्रमाण कमी करता येईल का? याची चाचपणी करण्याचे निर्देशही यादव आणि गोयल यांनी दिले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

Bank Holidays: आता दर शनिवार-रविवारी बँकांना सुट्टी? सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.