Health Tips : मानवी जीवन जगत असताना काहीना काही तरी आजार हा जाणवत असतोच. त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला जातो. पण, असे काही आजार असतात ते जाणवतातच. त्यापैकी एक म्हणजे मधुमेह अर्थात डायबिटिस. मात्र, या मधुमेहावर कांदा रामबाण उपाय म्हणून पाहिले जाते.
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याचा अर्क हा सर्वात प्रभावी आणि सहजरित्या उपलब्ध असल्याचे संशोधकांचे मत आहे. कांद्यामुळे मधुमेहासारख्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो. एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. कांद्याचा अर्क अनियंत्रित रक्तातील साखर नियंत्रित करण्यात चमत्कारी सिद्ध होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याचा रस हा सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध मार्ग असू शकतो.
कांद्याच्या अर्काने रक्तातील साखर 50 टक्के कमी केली जाऊ शकते. कांद्याचा अर्क मधुमेहावरील औषधांइतकाच प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. कांद्यामुळे माणसांनाही मधुमेहापासून आराम मिळू शकेल, असे सांगण्यात येत आहे. अमेरिकेत आयोजित वार्षिक परिषदेत एक संशोधनही सादर करण्यात आले होते. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी कांदा हा सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध पदार्थ असल्याचे सांगितले गेले.