tourism news : पुणे : अनेकदा सुट्टी सुरु झाली की कुठंतरी फिरायला जाण्याचा विचार होत असतो. मग त्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी नेणार असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. असे केल्यास नंतर होणाऱ्या अडचणींपासून दूर राहता येऊ शकेल. त्यामुळे काही माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.
लाँग टूरला अर्थात दूरच्या प्रवासाला गाडी घेऊन जाणार असाल तर किमान दोन दिवस आधी जावे. कारण गाडीचे अधिक काम निघाल्यास ते पूर्ण करता येऊ शकणार आहे. गाडी बाहेर नेण्यापूर्वी इंजिन ऑईल, बॅटरीचे टर्मिनल, वायपर, ब्रेक ऑईल, टायरची हवा, गाडीची स्टेपनी, ब्रेक यांसारख्या गोष्टी मॅकेनिककडून व्यवस्थित चेक करुन घ्यावीत. ज्या दिवशी प्रवासाला निघणार असाल त्या दिवशी गाडीमध्ये सर्व गाडीचे कागदपत्र आरसी बुक, इन्श्युरन्स, पीयूसीसोबत घ्यावे.
याशिवाय, गाडीमध्ये किमान दोन लिटर पाण्याच्या भरलेल्या बाटल्या असाव्यात. गाडीत इमर्जन्सीच्या वेळेला उपयोगी पडू शकतात. प्रवासात सोबत कोणी लहान मुले असल्यास त्या लहान मुलांना मागच्या सीटवर बसवणे योग्य असेल. तसेच उलटी, मळमळच्या गोळ्या सोबत घ्याव्यात. प्रवासाला जाताना नेहमी गाडीमध्ये औषधोपचार बॉक्स, काही महत्वाच्या गोळ्या ठेवाव्यात. या गोळ्या ऐनवेळी उपयोगाला येऊ शकतात.