लोणीकंद, (पुणे) : पुण्यातील वाघोली परिसरात २९ नोव्हेंबरला महेश साधू डोके याचा गायकवाड याने कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण खून केला होता. या घटनेचे साक्षीदार कृष्णकांत यादव यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, लोणीकंद पोलिसांनी त्याचा माग काढत चार दिवसांत आरोपीला अटक केली आहे. सागर अशोक गायकवाड (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. प्रेमसंबंधात असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वाघोली परिसरात २९ नोव्हेंबरला गायकवाड याने महेश डोके याच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. या प्रकरणानंतर त्याच्यावर गुन्हा केल्यानंतर गायकवाड फरार झाला होता. तो दौंडजवळील पारगाव या गावी पळून गेला. त्यानंतर कोणाकडून पैसे घेऊन तो यवतहून चेन्नईला जाण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा माग काढत यवत रेल्वे स्टेशन वरून तो चेन्नईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढत असताना पुणे पोलिसांनी त्याला अखेर अटक केली.
बोलण्याचे टाळल्याने डोकेचा खून
दुचाकी चालवण्याच्या बहाण्याने ओळख झाल्यानंतर डोके आणि गायकवाड यांच्यात संबंध निर्माण झाले. यानंतर गायकवाड हा डोके याला कॉलेजमध्ये सोडत असायचा. तसेच वसतिगृहात नियमित आणायचा. मात्र, डोके याने गायकवाडला टाळण्यास सुरुवात केली. याच रागातून आरोपीने संतापून डोकेचा खून केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.