Health Tips: पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपलं आरोग्य सुदृढ असावं यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आपल्याला काही आजार उद्भवू नये यासाठी नियमित व्यायाम, आहार, आरोग्य तपासणी याकडे लक्ष दिले जाते. पण असे काही आजार आहेत ते काही केल्या उद्भवतातच. त्यापैकी एक म्हणजे मुतखडा अर्थात किडनी स्टोन.
मुतखडा होण्यामागची अनेक कारणं असू शकतात. पण जेव्हा याचा त्रास सुरु होतो तो असह्य होतो. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास काही प्रमाणात आराम मिळू शकतो. त्यामध्ये ऍपल सायडर व्हिनेगर. मूत्रपिंडाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी हे फार मदत करते. ऍपल सायडर व्हिनेगरने किडनीवरील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून किडनी स्टोन कमी होतो. या सायट्रिक ऍसिडने मुतखडा स्टोन विरघळण्यास मदत होते.
तसेच जेवणामध्ये दूध, दही, चीज आणि ऑक्सलेटयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता कमी होते. कॅल्शियम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. किडनी स्टोनचा धोका कमी करण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करणे आवश्यक आहे. त्यातच तुळशीचा चहा ऍसिटिक ऍसिडचा उत्तम स्त्रोत आहे. किडनी स्टोनचा त्रास कमी होण्यासाठी हा चहा फायदेशीर ठरतो. किडनी स्टोन फोडण्यासाठी हा तुळशीचा चहा गुणकारी ठरतो. यामुळे स्टोन विरघळतो आणि लघवीवाटे निघून जातो.
याशिवाय, ओव्याच्या रोपाची मुळं ही देखील किडनी स्टोनवर प्रभावी मानली जातात. मुतखडा तयार होण्यासाठी कारणीभूत असलेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास ओव्याच्या रोपाची मुळं मदत करतात. बऱ्याच काळापासून ओवा पारंपारिक औषध म्हणून वापरला जातो. अगदी पोट दुखीपासून ते किडनी स्टोनपर्यंत सगळ्यावर ओवा अतिशय फायदेशीर आहे, याचा वापर केल्यास नक्कीच फायदा होतो.