लहू चव्हाण
पाचगणी : सह्याद्री मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मुकुंद सखाराम शिंदे यांना लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी जन्मशताब्दी पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल पत्रकार शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पुस्तकांचं गाव भिलर येथील लोकनेते स्वातंत्र्य सैनिक भि. दा. भिलारे गुरुजी स्मारक समितीच्या बैठकीत हा पत्रकारितेतील पुरस्कार समितीने जाहीर केला. मुकुंद शिंदे हे पेशाने शिक्षक असले तरी दैनिक पुढारी या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करीत असून या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. तर आपल्या लेखणीच्या द्वारे समाजातील अनेक समस्या त्यांनी मांडल्या असून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे
या कामाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजपूरे, उपाध्यक्ष प्रवीण भिलारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार मुकुंद शिंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचे पत्रकारिता, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.