शिरूर: बालकांसाठी त्यांचे लहानपण अनमोल असून त्यांचे आनंदीमय जीवन हिरावून घेऊ नका. त्यांचे हक्क आणि अधिकारासाठी कायदा करण्यात आला आहे. त्याबरोबर त्यांचे लैगिक शोषण होत असेल तर तत्काळ त्यांच्या विरोधात पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून द्या, असे आवाहन अॅड. सोनाली माने यांनी केले.
शिरुर येथील तरडोबाची वाडी येथे कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ यांनी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा समन्वयक सुभाष गटकने, प्रकल्प आधिकरी अमोल राठोड, वैशाली चव्हाण, शुभांगी मैड, माधुरी कोरेकर ,अनिल कांबळे, पद्मश्री दीक्षित, ललिता पोळ, ज्ञानेश ब्राम्हने हे उपस्थित होते.
या शिबिरात बालकामगार, बाल हक्क, बालविवाह व बाल लैंगिक अत्याचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेच्या कामाविषयी चर्चा सत्र आयोजित केले होते. ही संस्था शिरूर तालुक्यातील 40 गावांमध्ये काम करत असून मुलांच्या हक्क व आधिकरांसाठी लढत असते. करुणामय भारत निर्माण करण्यासाठी संस्थेने चळवळ देखील सुरू केली आहे. त्याचे काम शिरूर तालुक्यात काम सुरू केले आहे.
शिरूर तालुक्यात 40 गावात या संस्थेने काम सुरू केले आहे. त्यामाध्यमातून बालकांना हक्काचे शिक्षण मिळवून देण्याचे काम करण्यात येत आहे. भविष्यात ही पिढी सदृढ होण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम हाती घेण्यात येईल.
-वैशाली चव्हाण सहाय्यक प्रकल्प अधिकारी