Nirav Modi : मुंबई : पंजाब नॅशनल बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने नीरव मोदींची 71 कोटींची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेला परवाणगी दिली आहे. त्याबाबतची मागणी करणारी याचिका मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा विशेष न्यायालयाने बुधवारी सदर याचिकेला परवानगी दिली.
कोणती-कोणती मालमत्ता जप्त
जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये कुर्ल्यातील कोहिनूर शहरातील कार्यालयाची जागा, सुमारे 24.6 कोटी रुपयांच्या खालच्या तळघरातील पाच झाकलेल्या कार पार्किंगच्या जागा, 26 लाख रुपयांच्या बेंटलीसह आठ वाहने, 9.8 लाख रुपयांची फोर्स मोटर ट्रॅव्हलर आणि 2.3 लाख रुपयांची अल्टो आणि फोर सीझन्स हॉटेलमध्ये 35.5 लाख रुपयांच्या दागिन्यांच्या 16 नगांच्या साठ्याचा समावेश आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांचे कन्सोर्टियम यांनी फरारी आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीची 71 कोटी रुपयांची मालमत्ता सोडण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयात केली होती. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने सदर संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली होती. ही संपत्ती आता पीएनबी आपल्या ताब्यात घेऊन नियमाप्रमाणे करणार कारवाई करणार आहे.