मुंबई : नितेश राणे यांच्याकडून ७ मे रोजी एक वक्तव्य करण्यात आले होते. येत्या १० जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. या प्रकरणी माझगाव कोर्टाने नितेश राणे यांना समन्स बजावले होते.
मात्र, माझगाव कोर्टाने समन्स बजावल्यानंतरही नितेश राणे सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर माझगाव कोर्टाकडून नितेश राणे यांच्याविरोधात बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना कोर्टात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानीच्या दावा प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना वॉरंट बजावण्यात आले आहे. नितेश राणे यांना माझगाव कोर्टाने सुनावणीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावले होते. पण माझगाव कोर्टाने समन्स बजावल्यानंतरही नितेश राणे सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यानंतर माझगाव कोर्टाकडून नितेश राणे यांच्याविरोधात बेलेबल वॉरंट जारी करण्यात आले.
दरम्यान, नितेश राणे यांनी कोर्टाकडून बजावलेले समन्स आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत, असे उत्तर नितेश राणे यांनी दिले आहे. समन्सनुसार, नितेश राणे यांनी आज कोर्टात हजर राहणे आवश्यक होते. कोर्टात हजर राहणे शक्य नसल्यास वकिलांकडून उत्तर देणे अपेक्षित होते. पण तसे काहीही झाले नाही. त्यामुळे कोर्टाने नितेश राणे यांच्याविरोधात बेलेबल वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना कोर्टात उपस्थित राहून जामीन घ्यावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.