पुणे: मोबाईल फोन ही आजकाल प्रत्येक माणसाची गरज बनली आहे. पैशांचा व्यवहार असो किंवा परदेशात बसलेल्या नातेवाईकांशी बोलणे असो, ही सर्व कामे फोनद्वारे सहज करता येतात. या बरोबरच फोनचा गैरवापर करून चोरटेही फसवणूक करत आहेत. आजकाल, एक टोळी व्हिडिओ कॉल करते, नग्न मुली दाखवते आणि नंतर लोकांना फसवते. त्यानंतर पैशांची मागणी करतात आणि लोकांना त्यांचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्याची धमकी देतात. या गोष्टीला सेक्सटोर्शन असे म्हणतात. सध्याच्या घडीला देशभरात मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषणाच्या फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथे राहणारे 36 वर्षीय नवीन हे देखील सेक्सटोर्शनचा बळी ठरले. व्हिडिओ कॉलमुळे त्यांचे जीवन हे नरक होईल याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. एके दिवशी दोन मुलांचे वडील असलेल्या नवीन यांना सोशल मीडियावर एक लिंक आली. एका 23 ते 25 वर्षांच्या तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यांनी ती रिक्वेस्ट मान्य केली आणि मग बातचीत सुरू झाली. काही दिवसांपूर्वी नवीन हा बाहेरगावी दौऱ्यावर गेले होते. त्याच रात्री त्यांना व्हिडिओ कॉल आला. नवीन यांना काही समजेपर्यंत ते सेक्सटोर्शनच्या जाळ्यात अडकले होते.
याविषयी नवीन यांनी सांगितले की, कॉल येताच त्यांनी तो उचलला आणि काही उत्तर देण्यापूर्वीच व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारी मुलगी नग्न झाली. नवीन म्हणाले, ‘तिने कपडे काढले. ती मला कपडे काढण्यास सांगू लागली. अशा परिस्थितीत काय करावे? हे सुचत नव्हते. मी त्यामध्ये अडकलो. ऑनलाईन दिसणारी देसी होती. ती हिंदी भाषिक, पण नंबर परदेशी होता. कॉल संपल्यावर खरी कहाणी सुरू झाली. नवीनने सांगितले की, त्याच नंबरवरून कॉल्स येऊ लागले आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती होती जो म्हणत होता, तुमचा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड झाला आहे. तुला सर्वकाही ठीक हवे असेल तर पैसे पाठव, नसेल तर व्हिडिओ कॉलची लिंक सर्व सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल होईल.
आत्महत्येचा विचार
नवीन पुढे म्हणाले, ‘मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला छोटी रक्कम टाका. मी नाही म्हणालो. तो म्हणाला तुझा फोन विकून टाक . मी म्हणालो, तो फक्त हजार रुपयांचा आहे. नंतर त्याला वेगवेगळ्या नंबरवरून फोन येऊ लागले. मग तो मला धमक्या देऊ लागला म्हणून मी पण त्याला धमकावत म्हटलो, जे काही करायचे ते करा. नवीनने हिंमत दाखवत संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली. अशा वेळी अनेकदा असे दिसून आले आहे की, जेव्हा व्यक्ती फसते तेव्हा आपल्या कुटुंबाबासोबत गोष्टी शेअर करत नाही. मनात चुकीचे विचार येऊ लागतात, पण नवीनने येथे शहाणपण दाखवले. नवीनने सांगितले की, धमकीच्या कॉलमुळे तो इतका व्यथित झाला होता की, त्याने एकदा आत्महत्या करण्याचा विचारही केला होता. पोलिसांनी अशा फोन कॉल्सपासून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा घटनांची तात्काळ पोलिसांकडे तक्रार करावी.
व्हिडीओ कॉलची टोळी जेष्ठ नागिरकांनाही करते टारगेट
असे नाही की हे लोक फक्त तरुण लोकांचीच शिकार करतात. म्हातार्या लोकांनाही त्यांचे फोन येतात. बिहारच्या जेहानाबादमध्येही व्हिडिओ कॉलचे बळी पडलेले लोक सापडले. ५५ वर्षीय गिरिजानंदन प्रसादही त्यांच्या तावडीत अडकले. गिरिजानंदन प्रसाद हे पेशाने वकील आहेत. एके दिवशी रात्रीचे दहा वाजले होते. तेवढ्यात फोन वाजला. मी व्हिडिओ कॉल उचलला तेव्हा समोरची मुलगी आक्षेपार्ह अवस्थेत होती. ब्लॅकमेल लिंक मिळाल्यानंतर वकील पोलिसांकडे गेले. तक्रार दाखल केली. काही दिवस धमक्या दिल्यानंतर खंडणीचे कॉल्स थांबले.