पिंपरी : मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकें यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यावर ‘ॲट्रॉसिटी’ चा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका ३६ वर्षीय वाहन चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सुधाकर शेळके आणि मॉण्टी दाभाडे दोघेही (रा. तळेगाव दाभाडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे १० सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या समोरील सेवा रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी सुधाकर शेळके आणि मॉण्टी दाभाडे हे तेथे गाडीतून आले आणि फिर्यादी यांना आरोपींनी अपमानित करून जातीवाचक शिवीगाळ केली. आणि धमकी दिली आहे. याप्रकरणी फिर्यादीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट करीत आहेत.