World Cup 2023 Final : पुणे : जी एअरलाइन्सला दिवाळीतही करता आली नाही ती एका दिवसात क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमुळे करता आली आहे. वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमी एक दिवस आधीच गुजरातमध्ये दाखल झाले होते. म्हणजेच 18 नोव्हेंबरला. त्या दिवसात विमानाने प्रवास करण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. शनिवारी देशभरात सुमारे ४.६ लाख लोकांनी हवाई प्रवास केला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
मुख्यमंत्री शिंदे,अदाणींनीनी अभिनंदन केले
विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सोशल मीडियावर याबद्दल लिहिले की, १८ नोव्हेंबर रोजी भारतीय विमान उद्योगाने इतिहास रचला. या दिवशी आम्ही ४,५६,७४८ प्रवाशांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक केली. शनिवारी मुंबई विमानतळावर एकाच दिवसात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी झाली. त्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतूक केले. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी X वर लिहिले की, ही आमच्यासाठी ऐतिहासिक संधी आहे. मुंबई विमानतळावर एकाच दिवसात १.६१ लाखांहून अधिक प्रवासी दाखल झाले.
सप्टेंबरपासूनच भाडे वाढवले
दिवाळी अन् छठपूजा, तसेच क्रिकेटहून परतलेल्या प्रवाशांनी एअरलाइन्सची झोळी भरली. लोकांनी खूप महागडी तिकिटे खरेदी केली.सोमवारी अहमदाबाद ते मुंबई तिकिटाची किंमत १८ हजार ते २८ हजार रुपये आहे. तसेच अहमदाबाद ते दिल्लीचे तिकीट १० ते २० हजारांच्या दरम्यान आहे. मात्र, भविष्यात हे भाडे कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे. क्रिकेट वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी आगाऊ बुकिंगसाठी केली होती. त्याच दरम्यान विमान कंपन्यांनी भाडे वाढवण्यास सुरुवात केली होती. ऑक्टोबरच्या तिसर्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीचा फायदा उठवण्याच्या एअरलाइन्सच्या या हालचालीचा उलटा परिणाम झाला आणि अनेक प्रवासी रेल्वेकडे वळले.