पाचगणी : भारतीय जनता पार्टीच्या महाबळेश्वर तालुका अध्यक्षपदी पुस्तकांचे गाव भिलार येथील अनिल (नाना) भिलारे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी तानाजी भिलारे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तालुक्यातील आगामी निवडणुका भाजप पूर्ण ताकदीने लढविण्यासाठी तयारी करत आहे. त्यासाठी पक्षसंघटन अधिक मजबूत केले जात असून, भाजपचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.
अनिल नाना भिलारे यांनी पक्षात प्रवेश केल्यापासून कुठल्याही पदाची अपेक्षा न करता तालुक्यात शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यावर भर दिला आहे. आदरणीय पंतप्रधान मोदी यांचे विचार तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. या कामाची दखल घेवून अनिल भिलारे (नाना) यांना महाबळेश्वर तालुका अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे.
या निवडीबद्दल अनिल भिलारे व तानाजी भिलारे यांचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आमदार मदन भोसले, प्रदेश सचिव भरत पाटील, लोकसभा प्रभारी अतुल भोसले, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे, कोरेगावच्या नेत्या प्रिया शिंदे, लोकसभा संयोजक सुनील काटकर, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम आदींनी अभिनंदन केले.
या वेळी अनिल भिलारे यांनी, पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवू. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटन अधिक मजबूत करू. पक्षाचे विचार शेवटच्या माणसापर्यंत नेऊ, असा विश्वास व्यक्त केला.