Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाश्वत सुखाचा शोध संतसाहित्यापाशी येऊन थांबतो; डॉ. पंकज महाराज गावडे यांचे प्रतिपादन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 20 November 2023, 13:48

पिंपरी : “शाश्वत सुखाचा शोध संत साहित्यापाशी येऊन थांबतो,” असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. पंकज महाराज गावडे यांनी ‘संतत्व आणि साहित्य’ या विषयावर बोलताना केले. ना. धो. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू-आळंदी रस्ता, मोशी येथे रविवारी (ता. १९) नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनातील चौथ्या सत्रात डॉ. पंकज महाराज गावडे बोलत होते.

ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रामदास जैद सत्राच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, ह. भ. प. भानुदास महाराज तापकीर, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ह. भ. प. डॉ. पंकज महाराज गावडे पुढे म्हणाले की, “सर्वांच्या हिताचे असते, ते साहित्य अशी साहित्याची व्याख्या केली जाते. त्या निकषानुसार संतसाहित्य हेच खरे साहित्य आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. विश्वाचे आर्त जेव्हा अंत:करणात प्रकटते अन् त्यातून परतत्त्वाला स्पर्श करणारे संत तत्त्व म्हणजेच संतत्व प्रकट होते.

 

अत्यंत दु:खाची निवृत्ती आणि परम सुखाच्या प्राप्तीचे साधन म्हणजे संतत्व असते. संतसाहित्य हे समाजोगामी साहित्य आहे. यामध्ये नवरसांचा परिपोष होत असला तरी प्रामुख्याने शांतरस हा त्यातील प्रधानरस आहे.‌ ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी संत मुक्ताबाई यांचे ‘ताटीचे अभंग’ अतिशय उपयुक्त आहेत. संतसाहित्य हे बहुतांशी संवाद स्वरूपात असल्याने माणूस त्याच्याशी लगेच तादात्म्य पावतो!”

अतिशय रसाळ वाणी अन् प्रासादिक शैलीतून केलेल्या निरूपणामुळे उपस्थितांना भक्तिरसात चिंब भिजवले. रामदास जैद यांनी अध्यक्षीय मनोगतातून निर्मल वारी, हरित वारी या प्रयोगांची माहिती देताना, “ज्ञानेश्वरी हा फक्त चिंतनाचा विषय नसून, तो अनुकरणाचाही विषय आहे!” असे मत व्यक्त केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सीमा काळभोर यांनी आभार मानले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

Dhangar Reservation : मराठा आरक्षणानंतर, आता धनगर आरक्षणासाठी जालन्यात 'महामोर्चा'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.