मुंबई : भारतीय बाजारपेठेतील टेलिकॉम क्षेत्रात नंबर एकची कंपनी म्हणून प्रसिद्ध असलेला Jio Telecom लवकरच आपलं नवं प्रॉडक्ट घेऊन येत आहे. टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ ‘क्लाउड लॅपटॉप’ लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून हा लॅपटॉप 15 हजार रुपयांपर्यंत मिळू शकणार आहे. यासाठी कंपनी एचपी, एसर, लेनोवोसह इतर कंपन्यांश बोलणी सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे.
क्लाउड हे सॉफ्टवेअर असेल, जे कोणत्याही सिस्टीम तसेच स्मार्ट टीव्हीमध्ये इन्स्टॉल करता येणार आहे. त्यात हार्डवेअर, मेमरी, प्रोसेसिंग पॉवर, चिपसेट आणि इतर काही गोष्टींचा समावेश आहे. लॅपटॉपची पॉवर आणि क्षमता असलेल्या हार्डवेअरमुळे किंमत वाढण्याची शक्यता आहे. पण याची किंमत सध्या जाहीर केली नसली तरी याची वाढीव किंमत कमी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. लॅपटॉपची संपूर्ण प्रक्रिया जिओ क्लाउडच्या बॅक एंडला केली जाणार आहे.
जिओ क्लाउडवर सर्व स्टोरेज आणि प्रोसेसिंगसह एक ‘टर्मिनल’ असेल, जे युजर्सना सर्व सेवा उपलब्ध करून देते. एचपी क्लाउड लॅपटॉपसाठी क्रोमबुकची टेस्ट केली जात आहे. मात्र, अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. लॅपटॉपची किंमत अद्याप समोर आली नाही. लवकरच याची किंमत आणि इतर सर्व फिचर्सविषयी कंपनीकडून माहिती दिली जाणार आहे.