पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विकासात्मक राजनिती आहे. त्यांच्या ध्येय धोरणानुसार काम करून समाजाचा विकास करून देशाची प्रगती करू. आपण सोशल मिडीयाचे संघटन व कामकाजावर जोर देवू आणि मोदींच्या मार्गदर्शनाखाली शिरूर लोकसभा मतदार संघात कमळ फुलणार असल्याचे प्रतिपादन केंद्रिय मंत्री रेणुका सिंह यांनी केले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री रेणुका सिंह शिरूर लोकसभा प्रवास योजना व नियोजनासाठी पुण्यात आल्या आहेत. शिरूर लोकसभा प्रवास योजना व नियोजनासाठी आयटी ,सोशल मिडीया प्रकोष्ठ, युवामोर्चा पदाधिकारी यांचेशी संवाद साधण्यासाठी सणसवाडी येथील शिवम लॉन्स येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन रेणुका सिंह यांनी केले आहे. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांचे सुवासीनींनी ओवाळून व सणसवाडी भाजपा आघाडीतर्फे फेटा बांधून स्वागत व सत्कार करण्यात आला. शिवप्रतीमेला पुष्पहार घालून मेळाव्यास प्रारंभ होताच छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला. तर या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सुदर्शन चौधरी यांनी नेता नसलेल्या अभिनेत्याला भोसरीचे पै. महेशदादा लांडगे यांचेकडून अस्मान दावू. असे सांगितले आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणनिस धर्मेंद्र खांडरे, अनु. जाती मोर्चाचे अध्यक्ष दिलीप शेलार, उपाध्यक्ष मारुती रणबावळे, भाजप सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्दन दांडगे, युवा मोर्चाचे सरचिटणीस सुदर्शन चौधरी, युवामोर्चा तालुकाध्यक्ष रोहित खैरे, खेड तालुका प्रमुख अतुल देशमुख, शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल पाचर्णे, कामगार आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासो दरेकर, सहकारचे उपाध्यक्ष महादेव वाखारे, दरेकरवाडीचे माजी सरपंच पोपट दरेकर, माजी चेअरमन गजाबाजू हरगुडे, कैलास सोनवणे, श्रीकांत सातपुते ,अंबादास कुरंदळे, बाळासो सैद, अमोल शिवले, संपत गव्हाणे, राहूल गवारे, प्रमिला दरेकर, अशोक हरगुडे, विद्याधर दरेकर, अतुल साठे, अमोल दरेकर, भाजप महिला आघाडीच्या मनिषा दरेकर, श्रेया दरेकर, श्रद्धा दरेकर धनश्री वाखारे, सारीका हरगुडे, भाग्यश्री गायकवाड, रेणुका कोळेकर, मनिषा दरेकर, श्रींकांत ढमढेरे, अवि देवकर, काळुराम मुरकुंडे, नितीन थोरात, संभाजी जाधव, नितीन गव्हाणे , अमोल शिवले , मोहन दरेकर , दत्तात्रय दरेकर, ज्ञानेश्वर मिडगुले, अतुल कुर्हाडे, विशाल फडतरे, बाळासो सैद व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन रोहीत खैरे यांनी मानले.