पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण ‘इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक’मध्ये विविध पदांसाठी भरती केली जात आहे. ही भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जाणार असून, या अंतर्गत रिक्ते पदे भरली जाणार आहेत.
‘इंडिया सिक्योरिटी प्रेस’ नाशिक येथे अधिवक्ता अथवा वकील पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या पदासाठी 4 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला दिला जाणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली. या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहेत. संबंधित अर्ज 4 डिसेंबर 2023 पर्यंत संस्थेपर्यंत पोहोचतील अशा अनुषंगाने पाठवावेत. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://ispnasik.spmcil.com/ वरून माहिती घेता येणार आहे.
कुठं पाठवायचा अर्ज?
मुख्य महाव्यवस्थापक, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक-रोड, महाराष्ट्र – ४२२ १०१.