Aaditya Thackeray : मुंबई : आदित्य ठाकरे यांच्यावर शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून पुलाचे उद्घघाटन केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरे अडचणीत आले आहे.
त्यांच्यावर एन एम जोशी पोलीस स्थानकात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पुलाची चाचणी झाली नसतानाही उद्धघाटन करण्यात आले आहे. यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईतील लोअर परळ उड्डाणपुलाची एक मार्गिका सुरु करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या मार्गिकेचे काम सुरु होते. हे काम अनेक दिवसांपासून रखडले होते. हे काम रखडल्यामुळे गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उद्घाटन करण्यात आले. पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमास आदित्य ठाकरे उपस्थित होते. पोलिसांनी या दोन अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुलाचे काम अपूर्ण असताना बेकायदेशीपणे उद्घाटन कसे केले? आम्ही तीन, चार दिवसांत काम पूर्ण करुन ही मार्गिका सुरु करणार होतो, अशी भूमिका मुंबई मनपाने घेतली आहे.
इकबाल चहल यांचे आदेश
पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी चार दिवसांत पूल सुरु करण्याचे आदेश दिलेत. तसेच मुंबई महानगरपालिकेकडून राहिलेल्या कामांना वेग देण्यात आला. पुलावर रंगकाम सुरु आहे. तसेच फायनल टचेस देण्याची कामे सुरू आहेत.