पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या कार्यालयात विविध रिक्त पदांसाठी भरती केली जात आहे. यामध्ये एकूण 14 रिक्त पदे भरली जाणार असून, यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे.(Thane police commissioner office recruitment)
ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयात विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी या पदांवर भरती होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला ठाणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. पात्र उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे.(Thane police commissioner office)
अशी असेल भरती प्रक्रिया…
- कुठं निघाली भरती? पोलीस आयुक्त ठाणे शहर यांचे कार्यालय.
- पदाचे नाव : विधी अधिकारी गट अ, विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी.
- रिक्त पदे : 14 पदे.
- नोकरीचे ठिकाण : ठाणे.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा, मुलाखत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2023.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प), ता. जि. ठाणे पिन नं. 4600601.
या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.thanepolice.gov.in/ वरून माहिती घेता येऊ शकणार आहे.