Cabinet Meeting : मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील राज्यातील अनेक प्रलंबीत विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अनेक सुधारीत निर्णय घेण्यात आले. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी करण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
पीक पाण्यासह दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेण्यत आली. या बैठकीत मराठवाड्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातीस 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे. तर मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता देण्यात आली आहे. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित करण्यात येणार आहे. राज्यातल्या अनेक ग्रामपंचायतींच्या इमारती धोकाजायकझाल्या आहेत, त्यांच्या कामांसाठी निधी वाढवला गेला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी
कॅबिनेट बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रीकॅबिनेट बैठक घेतली होती. मात्र, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला गसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ उपस्थित नव्हते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री आणि आमदार उपस्थित होते. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 चा अहवाल कॅबिनेटसमोर सादर केला . त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीआधी अजित पवारांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.