अहमदाबाद: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा अंतिम सामना (World Cup 2023 Final) रविवार, 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ अहमदाबादला पोहोचला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता टीम अहमदाबादला पोहोचताच हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दी झाली.
टीम इंडिया अहमदाबादला पोहोचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चाहत्यांचा जमाव दिसत असून एका बाजूने टीमची बस येताना दिसत आहे. टीम बस पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने अहमदाबादला पोहोचली आहे.
12 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी हातात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. भारतीय संघाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. आता टीम इंडियाला तिसर्यांदा वर्ल्ड चॅम्पियन व्हायला चाहत्यांना नक्कीच आवडेल.
Team India have reached Ahmedabad.
– Time to win the World Cup. ????????????pic.twitter.com/rzTTIVbJnT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 16, 2023
उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला
या स्पर्धेच्या लीग स्टेजमध्ये अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला होता. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 50 षटकात एकूण 397/4 धावा केल्या. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी संघाकडून शतके झळकावली होती. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी 48.5 षटकांत 327 धावांत गुंडाळले. भारताकडून मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. ,