पुणे : तीर्थक्षेत्र आळंदीसह शिरूर लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेणार आहे. त्या अडचणी सोडवून सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंग यांनी दिली आहे.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास रेणुका सिंग यांनी सद्दिच्छा भेट देत श्रींचे दर्शन घेतले. यावेळी रेणुका सिंग यांनी वरील ग्वाही दिली. यावेळी श्री ह. भ. प. गोविंद महाराज केंद्रे संस्था ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिर येथे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक मारुती महाराज कुऱ्हेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा चिटणीस क्रांतीताई सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजपचे वतीने आयोजित शिरूर लोकसभा मतदार संघातील प्रवास या कार्यक्रामानिमित्त केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंग आळंदीत आल्या होत्या. या निमित्त त्यांनी आळंदीतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी रेणुका सिंग यांचे देवस्थानचे वतीने उपव्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांचे हस्ते तसेच महसूल विभागाचे वतीने नायब तहसीलदार मदन जोगदंड यांनी स्वागत करून सत्कार केला.
यावेळी बोलताना रेणुका सिंग म्हणाल्या, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पवित्र भूमीत येण्याचे मला भाग्य लाभले. लोकसभा प्रवास तर बहाणा आहे. यानिमित्त माऊलींचा आशीर्वाद, आपला आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र क्षेत्रात येता आले. महाराष्ट्रात अनेक स्वातंत्र सेनानी घडले, महान संतांचे पवित्र भूमीत येता आले. हे माझे भाग्य समजते.
रेणुका सिंग यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील ह. भ. प. महाराज मंडळी, वारकरी संप्रदायातील गायनाचार्य, मृदूंगमणी मान्यवरांशी श्री ज्ञानेश्वरी मंदिरात सुसंवाद साधला. यावेळी येथील अडीअडचणी समस्या जाणून घेत विविध विषयावर चर्चा केली. यावेळी येथील शेतकरी, स्वच्छता आणि नमामि गंगा या नदी स्वच्छतेच्या उपक्रमाप्रमाणे आळंदी, देहू येथून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे स्वच्छतेचे कार्य आदी केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संबंधितांपर्यंत पोहोचविले जातील. असे रेणुका सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, आळंदीत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमांतर्गत आयोजित देशाचे संरक्षण करताना शिरूर लोकसभा मतदारसंघातील तसेच खेड तालुक्यातील जे वीर जवान शहीद झाले अशा कुटुंबीयांचा वीरमाता, वीर पत्नी यांचा सन्मान, तसेंच युध्दात सहभागी झालेल्या जेष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच युध्दात उत्तम कामगिरी बजावलेल्या माजी सैनिकांचा व भारत सरकारकडून पदक मिळालेल्या जवानांचा केंद्रीय आदिवासी कल्याण राज्यमंत्री रेणुका सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रेणुका सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिकांशी सुसंवाद, सैनिकांच्या विविध अडीअडचणी विषयी चर्चा, माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना येणाऱ्या अडचणीवर पाठपुरावा केला जाईल असे सांगितले. उपस्थितांना उत्साहात स्नेहभोजन देण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य व माजी तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, भाजपचे माजी गटनेते पांडुरंग वाहिले, माजी नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, संतोषानंद शास्त्री, कल्याण महाराज गायिका ज्योती गोराणे, विष्णू महाराज केंद्रे, भाऊ महाराज फुरसुंगीकर, दिलीप महाराज ठाकरे, निलेश लोंढे, पंडित गायकवाड, महाराज क्षीरसागर, पुरुषोत्तम महाराज पाटील, नामदेव महाराज चव्हाण, संग्रामबापू भंडारी, भागवत आवटे, पांडुरंग ठाकुर, अध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, सचिन गिलबिले, दिनेश घुले, संतोष गावडे, ज्ञानेश्वर बनसोडे, आकाश जोशी, सचिन सोळंकर, संकेत वाघमारे, प्रतिम किर्वे, गणेश गरूड, सदाशिव साखरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.