Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर अनंतात विलीन …!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 September 2022, 9:51

पुणे : महाराष्ट्र शासनाचा “विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार” विजेत्या ज्येष्ठ तमाशा कलावंत गुलाबबाई संगमनेरकर (वय-९०, रा. पुणे)) यांचे काल बुधवारी (ता.१४) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने तमाशा व लावणी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

गुलाबबाई संगमनेरकर यांचा जन्म १९३३ साली संगमनेर (जि. अहमदनगर) येथे झाला होता. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षापासूनच या लोककला क्षेत्रात आल्या. त्यांनी सुगंधाबाई सिन्नरकर, वनुबाई शिर्डीकर, गोदावरीबाई पुणेकर यांच्या बारीत पारंपरिक खड्या नृत्याची आणि बैठकीची लावणीचे धडे गिरवले. गोड आवाजामुळे त्यांनी पुढे बैठकीच्या लावणीत नाव कमावले. तमाशा क्षेत्रात नावामागे आदराने गावाचे नाव लावले जाते. त्यामुळे त्यांनी थोरात आडनावाऐवजी संगमनेरकर हे आपल्या गावाचे नाव जोडले आणि ते आपल्या कलागुणांनी रोशन केले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर दिल्लीमध्ये सादर झालेला लावण्यांचा कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या ‘आजोळची गाणी’ या अल्बममध्ये ‘राजसा जवळी जरा बसा..’ या लतादीदींच्या स्वरातील लावणीला गुलाबबाई यांच्या अदाकारीची साथ होती. त्यांना महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका यासह अनेक पुरस्कार लोककला क्षेत्रातील सेवेसाठी मिळालेले आहेत.

 

दरम्यान, गुलाबबाई संगमनेरकर यांचे बुधवारी (ता.१५) पुण्यातील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात कल्पना,अलका व वर्षा या तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक तमाशा व लावणी क्षेत्रातील कलावंत व नागरिक उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुरंदर तालुक्यात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी; डोक्यात विटा आणि काठ्या मारून 5 जण जखमी, तर 5 जणांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:49

केतन हत्याकांड प्रकरणाला वेगळं वळण! सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 3 July 2026, 17:45

प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; विवाहबाह्य संबंधांच्या संशयातून विवाहितेची आत्महत्या? फुरसुंगी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 17:33

शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाचा दणका; मतदार यादी रद्द, निवडणूक पुन्हा होणार

Friday, 3 July 2026, 17:17

राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरात ‘ स्टिंग ‘ एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी ; राज्य सरकारचा मोठा निर्णय…

Friday, 3 July 2026, 16:53

‘केतनला संपवायचंय, तुही सोबत चल’ लोहगड खून प्रकरणाचं बीड कनेक्शन समोर; प्लॅनिंगमध्ये तिसऱ्याची एंट्री

Friday, 3 July 2026, 16:39
Next Post

तीर्थक्षेत्र आळंदीसह शिरूर लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणार : केंद्रीय मंत्री रेणुका सिंग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.