Mumbai News : मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाखेला भेट दिली यावेळी शाखेचा हायहोल्टेज ड्रामा शनिवारी संध्याकाळी अख्या महाराष्ट्राने पाहिला. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. यामुळे काल दुपारपासूनच शाखेच्या वादाचं पडसाद ठाणे, मुंबईत तसेच सोलापुरातही दिसले. दिवाळीच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी शाखेच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. यावेळी हायहोल्टेज ड्रामा सर्वांना पाहायला मिळाला. यानंतर परिसरात राजकीय वातावरण तापलं होत. मुंब्रा शाखा कुणाची यावरून सध्या वाद रंगला असताना उद्धव ठाकरे गट कायदेशीर सामना करणार आहेत. शाखेचा वाद लवकरच उच्च न्यायालयात जाणार असून ठाकरे गट याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा अतिक्रमणचा आरोपाखाली बुलडोझर लावून तोडण्यात आली. त्यानंतर काल (शनिवारी) उद्धव ठाकरे मुंब्र्यातील शाखेला भेट देण्यासाठी आले. पालिकेने शाखा पाडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपण मुंब्र्याला जाऊन शाखेची पाहणी करणारचं असं स्पष्ट केलं होतं. पण याआधीच उद्धव ठाकरे यांना पोलिसांनी मुंब्र्यात येण्यास मज्जाव करणारी नोटीस बजावली होती. तरीही ठाकरेंनी मुंब्रा शाखेला भेट दिली, यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार संजय राऊत आणि इतर ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.