BJP Manifesto : नवी दिल्ली : छत्तीसगड जिंकण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. भाजपने शेतकरी, बेरोजगार युवक, महिलांसाठी सवलतींची खैरात केली आहे. राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान अवघ्या चार दिवसांवर आले असतानाच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी ‘छत्तीसगढ २०२३साठी मोदींची हमी’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. दुसरूकडे काँग्रेसने धानउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विटंल २७०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. तर भाजपने प्रतिक्विंटल ३१०० रुपये देण्याची घोषणा करत काँग्रेसवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. गॅस सिलिंडर ५०० रुपयात, प्रत्येक विवाहित महिलेला दरवर्षी १२ हजार, प्रत्येक कुटुंबास १० लाखांचे आरोग्य कवच व गरिबांना रामलल्ला दर्शनाच्या योजनेची घोषणा केली आहे.
भाजपच्या घोषणापत्रात काय?
पाचशे रुपयात गॅस सिलिंडर, भाताला प्रतिक्विंटल ३१०० रुपये दर, प्रत्येक विवाहित महिलेला दरवर्षी १२ हजार रुपये, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १८ लाख घरे, तेंदूपत्ता संकलनासाठी ४५०० रुपये बोनस, दहा लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा कवच, गरिबासांठी ५०० नवीन जनऔषधी केंद्र, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत बस सुविधा, दिल्लीच्या धर्तीवर पाच एम्स, छत्तीसगडमधील पाच शक्तिपिठांचा विकास, गरिबांसाठी रामलल्ला दर्शन योजना, भुपेश बघेल सरकारमधील घोटाळ्यांची चौकशी करणीर असे भाजपच्या घोषणापत्रात म्हटलं गेलयं.