Health News : पुणे : आजकाल बहूतेक जॉब डेस्क जॉब असतात, ज्यामुळे दिवसभरातील बराच काळ नोकरदार वर्ग हा खूर्चीवर बसून काम करतो, दीर्घकाळ बसून राहण्यामुळे आरोग्याच्या धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्टस मेडिसनच्या नव्या संशोधनातून काही भयानक निष्कर्ष समोर आले आहेत. यानुसार, आपल्या दिनक्रमामध्ये रोज व्यायामाचा समावेश केला पाहिजेत. बैठ्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारा धोक्यांचा सामना करणे फार अवघत असते.
नॉर्वेमधील ट्रॉ विद्यापीठ आणि डेन्मार्कमधील आरहस विद्यापीठातील संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले की नॉर्वे, स्वीडनमधील ५० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचे व्यायामामुळे आरोग्या निरोगी आहे. तर जे लोक १२ तासांपेक्षा जास्त काळ बसून होते, त्यांचा लवकर मृत्यू होण्याचा धोका ३८ टक्के जास्त होता. रोज 30 मिनिटे व्यायाम केल्यास हा धोका कमी होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम खूप तीव्र असण्याची आवश्यकता नाही. वेगाने चालणे, आरामात सायकल चालवणे किंवा अगदी लहान मुलांसोबत किंवा पाळीव प्राण्यांसोबत खेळणे यांसारख्या साध्या हालचालींमुळेदेखील फरक पडू शकतो.
दीर्घायुष्य मिळू शकते
नियमित व्यायाम केल्यामुळे दीर्घायुष्य मिळू शकते हे सर्वांना माहित आहे. अनेक आजारांचा धोका कमी होऊन तुमचे आयुष्य वाढण्याची शक्यता असते. फक्त २० ते २५ मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करण्यामुळे पुरेसा फायदा मिळू शकतो.
आजारांचा धोका कमी
नियमित व्यायाम करण्यामुळे ह्रदयविकार, टाईप २ मधुमेह आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो असे जाणकार नेहमी सांगतात. वजन कमी करण्यासाठीदेखील हे फायदेशीर ठरते आणि ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते.
मानसिक आरोग्यासाठी फायदा होतो
व्यायाम करण्यामुळे फक्त शारीरिक आरोग्यावरच नव्हे, तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक प्रभाव होतो. नैराश्य, चिंता आणि तणाव अशा समस्यांचा धोका कमी होऊ शकतो. एकूणच सकारात्मका वाढल्यास मानसिक आरोग्य सुधारू शकते.
निरोगी आरोग्य
नियमितपणे व्यायाम करण्यामुळे एकूण आरोग्य सुधारते. शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते, म्हणजेच शांत झोप लागते. शरीराची लवचिकता वाढते. एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त सक्रिय करण्यास मदत करते आणि आयुष्याचा आनंद घेता येतो.