Pune News : पुणे : फसवणूक करून विनयभंगाचे गुन्हे वाढीस लागले आहेत. विद्यापीठात प्राध्यापक असल्याच्या बतावणीने युवतीचा विनयभंग केल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर घडली. या प्रकरणी केतन कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे. संबंधित तरुणी पीएमपी बसमधून प्रवास करत होती. (Pune News) ती गणेशखिंड रस्त्यावर उतरली. रात्री आठच्या सुमारास ती विद्यापीठ चौकातून विद्यापीठात जायला निघाली होती. त्याचवेळी रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला कुलकर्णी याने अडवले. आपण विद्यापीठामध्ये प्राध्यापक असल्याची बतावणी केली.
दरम्यान, गोड बोलून कुलकर्णी याने तिचा विश्वास संपादन केला. तसेच आपला मोबाइल क्रमांक दिला. त्यानंतर कुलकर्णी याने तिच्याशी असभ्य वर्तणूक केली. (Pune News) या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : भागीरथी missing’ चित्रपटाच्या पोस्टर आणि म्युझिक चे दिमाखादार सोहळ्यात लॉंचिंग